स्वाध्याय प्र. १. समर्पक उदाहरण लिहा.
उत्तर
(अ) विश्वेश्वरय्या यांनी घेतलेले कठोर परिश्रम –
Answer: शालेय शिक्षण घेत असतानाच विश्वेश्वरय्या आपल्या पित्याला पारखे झाले. घरची परिस्थिती बेताची होती. शिक्षणाचा भार आईवर पडू नये, म्हणून त्यांनी शिकवण्या करून पैसे उभे केले व पुष्कळ कष्ट घेतले. या कष्टाच्या कमाईतून त्यांनी महाविद्यालयाची पदवी प्रथम श्रेणीत संपादन केली.
