प्र.१
स्वाध्याय प्र. १. तुलना करा.
उत्तर
| कष्टकऱ्यांची दुपार | लेखनिकांची दुपार |
|---|---|
| (१) काबाडकष्ट करून दमलेला गाडीवान आपली हातगाडी थोड्याशा सावलीत लावून, आणखी चांगली वर्दी ‘येईल का?’ या विवंचनेत थोडा पहुडलेला असतो. | (१) कार्यालयातील लेखनिकांचे लक्ष हातातल्या नाही तर भिंतीवरच्या घड्याळाकडे लागलेले असते; कारण पोटात भुका लागलेल्या असतात. |
| (२) कोणी शेठ ‘ऊठ रे’ करून त्याला उठवतो; लांबची वर्दी मिळताच फारशी घासाघीस न करता तो हमाली कबूल करतो आणि दुपारचा आळस क्षणात बाजूला सारून, कपाळावर उपरणं बांधून तातडीने गाडी ओढायला तयार होतो. | (२) जेवणाच्या सुट्टीत संगणक बंद करून ते सहकाऱ्यांशी जिवाभावाच्या गप्पा मारतात, सुख-दुःख ‘शेअर’ करतात आणि एकमेकांच्या डब्यांतल्या पदार्थांची चव चाखतात. |
| (३) तळपत्या उन्हात जरा कुठं डुलकी काढू-विसावू म्हणणाऱ्या सायकलरिक्षावाल्यांना कोणी तरी लांबची वर्दी देतो. | (३) सुट्टी संपताच दुपार ‘उठा-आराम बास’ म्हणते; मग ते पेनं सरसावतात, नाही तर संगणकाचा की-बोर्ड समोर ओढून घेतात. |
| (४) रात्रीची पोटाची खळगी भरण्याकरिता ते घाम पुसत भर दुपारी सायकल मारत निघतात; दुपार या कष्टकऱ्यांना सलाम करते. | (४) काम करता-करता कोणी खुर्चीतच थोडीशी डुलकी काढतो; दुपार हसत हसत त्याला माफ करते, हलकेच उठवते आणि मग तो अधिक जोमानं काम करू लागतो. |
