प्र.१
स्वाध्याय प्र. १. खालील फरक लिहा.
उत्तर
| व्यंगचित्र | हास्यचित्र |
|---|---|
| व्यंगचित्र म्हणजे हास्यचित्राचा पुढला टप्पा. | सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र, म्हणजे हास्यचित्र. |
| व्यंगचित्रसुद्धा आपल्याला हसवतं; पण केवळ हसवणं एवढाच त्याचा हेतू नसतो. | हास्यचित्राचे वैशिष्ट्य म्हणजे ते पाहिलं, की आपल्याला हसू येतं. |
| व्यंगचित्र पाहिल्यावर आपल्याला हसूही येतं आणि ते आपल्याला त्याशिवाय काहीतरी सांगू पाहत असतं. | एकाच भागाचं कार्टून पाहून खुदकन हसू येतं; असं चित्र हे हास्यचित्र असतं. |
| व्यंगचित्रापाशी थोडं थांबलं, तर त्यात काही गमतीदार विचार मांडलेला असतो, हे लक्षात येतं. | विनोदी माणूस एखाद्याच्या वागण्या-बोलण्याची जशी हुबेहूब नक्कल करतो, तशी हास्यचित्र ही चित्राची गमतीदार हुबेहूब नक्कल असते. |
| उदा., डेव्हीड लँग्डन यांचे भोकाड पसरणाऱ्या मुलाचे चित्र — लक्षपूर्वक पाहिल्यावर सेफ्टी पिन दिसते आणि रडण्याचे ‘कारण’ समजते. | उदा., शि. द. फडणीस यांचे दुधाच्या बाटलीने लहानग्या रोपट्याला पाणी घालणाऱ्या मुलीचे हास्यचित्र. |
