School Study

इयत्ता ९ वी मराठी कुमारभारती पाठ ६: हास्यचित्रांतली मुलं (स्थूलवाचन)

प्र.१

स्वाध्याय प्र. १. खालील फरक लिहा.

उत्तर

व्यंगचित्रहास्यचित्र
व्यंगचित्र म्हणजे हास्यचित्राचा पुढला टप्पा.सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र, म्हणजे हास्यचित्र.
व्यंगचित्रसुद्धा आपल्याला हसवतं; पण केवळ हसवणं एवढाच त्याचा हेतू नसतो.हास्यचित्राचे वैशिष्ट्य म्हणजे ते पाहिलं, की आपल्याला हसू येतं.
व्यंगचित्र पाहिल्यावर आपल्याला हसूही येतं आणि ते आपल्याला त्याशिवाय काहीतरी सांगू पाहत असतं.एकाच भागाचं कार्टून पाहून खुदकन हसू येतं; असं चित्र हे हास्यचित्र असतं.
व्यंगचित्रापाशी थोडं थांबलं, तर त्यात काही गमतीदार विचार मांडलेला असतो, हे लक्षात येतं.विनोदी माणूस एखाद्याच्या वागण्या-बोलण्याची जशी हुबेहूब नक्कल करतो, तशी हास्यचित्र ही चित्राची गमतीदार हुबेहूब नक्कल असते.
उदा., डेव्हीड लँग्डन यांचे भोकाड पसरणाऱ्या मुलाचे चित्र — लक्षपूर्वक पाहिल्यावर सेफ्टी पिन दिसते आणि रडण्याचे ‘कारण’ समजते.उदा., शि. द. फडणीस यांचे दुधाच्या बाटलीने लहानग्या रोपट्याला पाणी घालणाऱ्या मुलीचे हास्यचित्र.

या पाठातील आणखी प्रश्न