School Study

इयत्ता ९ वी मराठी कुमारभारती पाठ ८: दुपार

प्र.१

स्वाध्याय प्र. १. तुलना करा.

उत्तर

कष्टकऱ्यांची दुपारलेखनिकांची दुपार
(१) काबाडकष्ट करून दमलेला गाडीवान आपली हातगाडी थोड्याशा सावलीत लावून, आणखी चांगली वर्दी ‘येईल का?’ या विवंचनेत थोडा पहुडलेला असतो.(१) कार्यालयातील लेखनिकांचे लक्ष हातातल्या नाही तर भिंतीवरच्या घड्याळाकडे लागलेले असते; कारण पोटात भुका लागलेल्या असतात.
(२) कोणी शेठ ‘ऊठ रे’ करून त्याला उठवतो; लांबची वर्दी मिळताच फारशी घासाघीस न करता तो हमाली कबूल करतो आणि दुपारचा आळस क्षणात बाजूला सारून, कपाळावर उपरणं बांधून तातडीने गाडी ओढायला तयार होतो.(२) जेवणाच्या सुट्टीत संगणक बंद करून ते सहकाऱ्यांशी जिवाभावाच्या गप्पा मारतात, सुख-दुःख ‘शेअर’ करतात आणि एकमेकांच्या डब्यांतल्या पदार्थांची चव चाखतात.
(३) तळपत्या उन्हात जरा कुठं डुलकी काढू-विसावू म्हणणाऱ्या सायकलरिक्षावाल्यांना कोणी तरी लांबची वर्दी देतो.(३) सुट्टी संपताच दुपार ‘उठा-आराम बास’ म्हणते; मग ते पेनं सरसावतात, नाही तर संगणकाचा की-बोर्ड समोर ओढून घेतात.
(४) रात्रीची पोटाची खळगी भरण्याकरिता ते घाम पुसत भर दुपारी सायकल मारत निघतात; दुपार या कष्टकऱ्यांना सलाम करते.(४) काम करता-करता कोणी खुर्चीतच थोडीशी डुलकी काढतो; दुपार हसत हसत त्याला माफ करते, हलकेच उठवते आणि मग तो अधिक जोमानं काम करू लागतो.

या पाठातील आणखी प्रश्न