थोडे आठवा. पचनसंस्था व श्वसनसंस्था यांचे कार्य कसे चालते?
उत्तर
पचनसंस्था — तोंड, जठर व लहान आतडे यांत अन्नाचे यांत्रिक व रासायनिक पचन होते. पचनातून तयार झालेली पोषकद्रव्ये मुख्यतः लहान आतड्यात शोषली जातात. रक्त त्यांचे शरीरातील पेशींपर्यंत वहन करते.
श्वसनसंस्था — हवा श्वसनमार्गाने फुफ्फुसांतील वायुकोशांपर्यंत पोहोचते. तेथे हवेतील ऑक्सिजन रक्तात जातो आणि रक्तातील कार्बन डायऑक्साइड वायुकोशांत येऊन उच्छ्वासाद्वारे बाहेर जातो. पेशी श्वसनात ऑक्सिजनचा उपयोग करून पोषकद्रव्यांतील ऊर्जा उपलब्ध करतात.
