प्र.१
स्वाध्याय 1. कार्बन, ऑक्सिजन व नायट्रोजन या चक्रांचे काळजीपूर्वक निरीक्षण करा व खालील तक्ता पूर्ण करा.
उत्तर
| जैव–भू–रासायनिक चक्र | जैविक प्रक्रिया | अजैविक प्रक्रिया |
|---|---|---|
| 1. कार्बन चक्र | (1) हिरव्या वनस्पतींद्वारे प्रकाशसंश्लेषण (CO₂ चे कर्बोदकात रूपांतर) (2) वनस्पती व प्राणी यांचे श्वसन (CO₂ मुक्त होणे) (3) अन्नसाखळीतून वनस्पतींकडून शाकाहारी, मांसाहारी व सर्वोच्च भक्षकांकडे कार्बनचे संक्रमण (4) जीवाणू व बुरशी यांच्याद्वारे मृत सजीवांचे अपघटन | (1) जीवाश्म इंधनाचे ज्वलन (2) लाकडाचे ज्वलन (3) वणवे (4) ज्वालामुखीचा उद्रेक (5) कारखान्यांतून CO₂ वायू बाहेर पडणे (6) पाण्यात CO₂ चे शोषण |
| 2. ऑक्सिजन चक्र | (1) वनस्पतींद्वारे प्रकाशसंश्लेषणात ऑक्सिजनची निर्मिती (2) वनस्पती व प्राणी यांच्याद्वारे श्वसनासाठी ऑक्सिजनचा वापर (3) प्राण्यांद्वारे शर्करा रेणूचे विघटन व CO₂ चे उत्सर्जन (4) मृत अवशेषांच्या विघटनात ऑक्सिजनचा वापर | (1) ज्वलन (2) गंजणे (3) वातावरणीय क्रिया-प्रक्रियांद्वारे ऑक्सिजनपासून ओझोनची (O₃) निर्मिती |
| 3. नायट्रोजन चक्र | (1) नायट्रोजन स्थिर करणाऱ्या जीवाणूंद्वारे नायट्रोजनचे जैविक स्थिरीकरण (2) वनस्पतींनी मातीतील नायट्रेटचे शोषण करून प्रथिने तयार करणे (3) अमोनीकरण – विघटकांद्वारे मृत अवशेष व उत्सर्जित पदार्थ यांचे विघटन होऊन अमोनिआ मुक्त होणे (4) नायट्रीकरण – अमोनिआचे नायट्राइट व नंतर नायट्रेटमध्ये रूपांतर (5) विनायट्रीकरण – नायट्रोजनयुक्त संयुगांचे नायट्रोजन वायूत रूपांतर | (1) वातावरणीय स्थिरीकरण – वीज चमकताना वातावरणातील नायट्रोजनचे नायट्रोजनच्या संयुगांत रूपांतर (2) औद्योगिक स्थिरीकरण – कारखान्यांमध्ये नायट्रोजनपासून खतांची निर्मिती |
