School Study

इयत्ता ९ वी विज्ञान आणि तंत्रज्ञान पाठ १५: सजीवांमधील जीवनप्रक्रिया

प्र.१

थोडे आठवा. पचनसंस्था व श्वसनसंस्था यांचे कार्य कसे चालते?

उत्तर

पचनसंस्था — तोंड, जठर व लहान आतडे यांत अन्नाचे यांत्रिक व रासायनिक पचन होते. पचनातून तयार झालेली पोषकद्रव्ये मुख्यतः लहान आतड्यात शोषली जातात. रक्त त्यांचे शरीरातील पेशींपर्यंत वहन करते.
श्वसनसंस्था — हवा श्वसनमार्गाने फुफ्फुसांतील वायुकोशांपर्यंत पोहोचते. तेथे हवेतील ऑक्सिजन रक्तात जातो आणि रक्तातील कार्बन डायऑक्साइड वायुकोशांत येऊन उच्छ्वासाद्वारे बाहेर जातो. पेशी श्वसनात ऑक्सिजनचा उपयोग करून पोषकद्रव्यांतील ऊर्जा उपलब्ध करतात.

या पाठातील आणखी प्रश्न