प्र.१
संतवाणी–(अ) जैसा वृक्ष नेणे — स्वाध्याय प्र. १. वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा.
उत्तर
| वृक्ष | संत |
|---|---|
| वृक्ष मान-अपमान जाणत नाही. | संत मान-अपमान जाणत नाहीत. |
| कोणी वृक्षाची पूजा केली, तरी त्याचे सुख वृक्षाला वाटत नाही. | कोणी संतांची स्तुती केली, तरी संतांना त्याचा आनंद वाटत नाही. |
| कोणी येऊन वृक्षाला तोडले, तरी वृक्ष ‘मला तोडू नका’ असे म्हणत नाही. | कोणी संतांची निंदा केली किंवा त्रास दिला, तरी संत राग धरत नाहीत. |
| वृक्ष पूजा करणाऱ्याशी व तोडणाऱ्याशी सारखेच वागतो. | संत निंदा व स्तुती समान मानतात; ते पूर्ण धैर्यवंत असतात. |