School Study

इयत्ता ९ वी मराठी कुमारभारती पाठ ११: यंत्रांनी केलं बंड

प्र.१

स्वाध्याय प्र. १. फरक सांगा.

उत्तर

यंत्रांद्वारे केली जाणारी कामेमाणसांद्वारे केली जाणारी कामे
(१) यंत्रांद्वारे कामे अतिशय वेगाने होतात. उदा., यांत्रिक मिस अय्यंगारने पाच सेकंदांत बारा पत्रे टाइप केली.(१) माणसांद्वारे कामे यंत्रांच्या तुलनेत सावकाश होतात; त्यांना अधिक वेळ लागतो.
(२) यंत्रे थकत नाहीत; ती न थांबता सतत काम करू शकतात.(२) माणसे काम करून थकतात; त्यांना विश्रांतीची गरज असते.
(३) यंत्रांनी केलेल्या कामात भावना, जिव्हाळा व माणुसकी नसते.(३) माणसांनी केलेल्या कामात जिव्हाळा, माणुसकी व प्रेम असते.
(४) केवळ यंत्रे काम करत असताना वातावरण एकाकी, उदास, शुष्क आणि निर्जीव वाटते.(४) माणसे काम करतात तेव्हा कचेरीत जिवंतपणा, गजबज, हास्यविनोद आणि कामाची धावपळ असते.

या पाठातील आणखी प्रश्न