School Study

इयत्ता ९ वी विज्ञान आणि तंत्रज्ञान पाठ ८: उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव

प्र.१

स्वाध्याय 1. खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाची निवड करून विधाने पूर्ण करा व त्याचे स्पष्टीकरण द्या.
(मायकोटॉक्झीन्स, कलिकायन, रायझोबिअम)

उत्तर

अ. यीस्ट कलिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करते.
स्पष्टीकरण : यीस्ट (किण्व) हे एकपेशीय कवक आहे. यीस्टच्या लंबगोलाकार पेशीवर एक छोटा गोलाकार फुगवटा तयार होतो, त्याला कलिका म्हणतात. ही कलिका वाढून यीस्टची नवीन पेशी तयार होते आणि काही काळाने ती जनक पेशीपासून वेगळी होते. यात नर व मादी युग्मकांचा संबंध येत नाही, म्हणून ही अलैंगिक प्रजननाची पद्धत आहे. प्रजननाच्या या अलैंगिक पद्धतीला मुकुलायन किंवा कलिकायन (Budding) म्हणतात. साखरेच्या द्रावणासारखे कार्बनी पदार्थ मिळाल्यास यीस्टची वाढ होते व कलिकायनाने प्रजनन जलद गतीने होते.

या प्रश्नाचे आणखी २ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा

या पाठातील आणखी प्रश्न