प्र.१
स्वाध्याय १. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
उत्तर
(१) ‘आनंदपूर साहिब’ या ठरावात अकाली दलाने कोणत्या मागण्या केल्या?
उत्तर: पंजाब राज्यात अकाली दल हा प्रमुख राजकीय पक्ष होता. १९७३ मध्ये अकाली दलाने ‘आनंदपूर साहिब’ ठराव मंजूर केला. या ठरावात पुढील मागण्या करण्यात आल्या होत्या :
- चंदीगढ पंजाबला द्यावे.
- इतर राज्यांतील पंजाबी भाषिक प्रांत पंजाबमध्ये समाविष्ट करावेत.
- सैन्यामधील शिखांचे संख्याप्रमाण वाढवावे.
- पंजाब राज्यास अधिक स्वायत्तता द्यावी.
पुढे १९७७ मध्ये अकाली दल हा पक्ष पंजाबमध्ये सत्तेवर आला. सत्ता घेताना अकाली दलाने जुन्या मागण्यांबरोबर नदी पाणीवाटपात पंजाबला पाणी वाढवून द्यावे आणि अमृतसर शहराला पवित्र शहर असा किताब द्यावा अशा मागण्याही केल्या.
या प्रश्नाचे आणखी २ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा