या प्रकरणात नवीन काय शिकणार आहोत?
उत्तर
या प्रकरणात संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेची पार्श्वभूमी, तिची उद्दिष्टे व तत्त्वे, प्रमुख घटक शाखा आणि त्यांची कार्ये यांचा अभ्यास करणार आहोत. आंतरराष्ट्रीय शांतता राखण्यासाठी ही संघटना कोणती भूमिका बजावते आणि तिच्या कार्यात भारताचे काय योगदान आहे, हेही समजून घेणार आहोत.
