प्र.१
स्वाध्याय प्र. १. फरक स्पष्ट करा.
लिओनार्दो यांनी वर्णिलेला चित्रकला व शिल्पकला यांतील फरक
उत्तर
| चित्रकला | शिल्पकला |
|---|---|
| लिओनार्दो यांच्या मते चित्रकला ही शिल्पकलेपेक्षा जास्त श्रेष्ठ दर्जाची कला आहे. | शिल्पकला ही चित्रकलेपेक्षा कमी दर्जाची कला आहे. |
| चित्रकला यांत्रिक नसते; चित्र काढताना मेंदूला अधिक विचार करावा लागतो. | शिल्पकला यांत्रिक असून मेंदूला कमी ताण देणारी असते. |
| चित्रकार चित्रातल्या जागा हव्या असलेल्या गोष्टींनी भरत राहतो. | शिल्पकार दगडातला नको असलेला भाग काढत राहतो. |
