सरावसंच 4.1 — 1. △ LMN मध्ये …… हा शिरोलंब आहे व …… ही मध्यगा आहे. (रिकाम्या जागेत योग्य रेषाखंडांची नावे लिहा.)
उत्तर
△ LMN मध्ये रेख LX हा शिरोलंब आहे व रेख LY ही मध्यगा आहे.
कारण : रेख LX हा शिरोबिंदू L मधून समोरील बाजू MN वर काढलेला लंब आहे (रेख LX ⊥ रेख MN), म्हणून रेख LX हा शिरोलंब आहे. रेख LY हा शिरोबिंदू L आणि समोरील बाजू MN चा मध्यबिंदू Y यांना जोडणारा रेषाखंड आहे, म्हणून रेख LY ही मध्यगा आहे.
