संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 — 1. पुढील प्रश्नांसाठी पर्यायी उत्तरे दिली आहेत त्यापैकी योग्य पर्याय निवडा.
उत्तर
(1) □ PQRS मध्ये m∠P = m∠R = 108° व m∠Q = m∠S = 72° तर पुढीलपैकी कोणत्या बाजू समांतर आहेत ?
(A) बाजू PQ व बाजू QR (B) बाजू PQ व बाजू SR
(C) बाजू SR व बाजू SP (D) बाजू PS व बाजू PQ
उत्तर: (B) बाजू PQ व बाजू SR
कारण: $$m\angle Q + m\angle R = 72^{\circ} + 108^{\circ} = 180^{\circ}$$. बाजू QR ही छेदिका मानली, तर ∠Q व ∠R हे छेदिकेच्या एकाच बाजूचे आंतरकोन आहेत आणि ते परस्परांचे पूरक आहेत. म्हणून बाजू PQ ∥ बाजू SR.
