सरावसंच 1.1 — 1. खाली दिलेल्या संख्यारेषेच्या आधारे पुढील अंतरे काढा.
आकृती 1.5
(i) d(B,E) (ii) d(J, A) (iii) d(P, C) (iv) d(J, H)
(v) d(K, O) (vi) d(O, E) (vii) d(P, J) (viii) d(Q, B)
उत्तर
(i) d(B,E)
संख्यारेषेवरून B चा निर्देशक 2 आणि E चा निर्देशक 5 आहे.
5 > 2 म्हणून मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करू.
$$d(B, E) = 5 - 2 = 3$$
उत्तर: $$d(B, E) = 3$$
