प्र.१
1. खालील तक्ता पूर्ण करा.
उत्तर
| अलैंगिक प्रजनन | लैंगिक प्रजनन |
|---|---|
| 1. कायिक पेशींच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास अलैंगिक प्रजनन म्हणतात. | 1. लैंगिक प्रजनन हे स्त्रीयुग्मक आणि पुंयुग्मक या जननपेशींच्या मदतीने होते. |
| 2. या प्रजननासाठी एकाच जनकाची आवश्यकता असते. | 2. लैंगिक प्रजननासाठी नर जनक आणि मादी जनक अशा दोन जनकांची आवश्यकता असते. |
| 3. हे प्रजनन फक्त सूत्री विभाजनाच्या मदतीने होते. | 3. युग्मकांची निर्मिती अर्धसूत्री विभाजनाने होते आणि त्यानंतर फलन घडून येते. |
| 4. या प्रजननाने तयार झालेला नवीन जीव जनुकीय दृष्ट्या जनकाशी तंतोतंत समान असतो. | 4. या प्रजननाने तयार होणारा नवीन जीव जनुकीय दृष्ट्या जनकांपेक्षा वेगळा असतो. |
| 5. द्विविभाजन, बहुविभाजन, कलिकायन, खंडीभवन, पुनर्जनन, शाकीय प्रजनन, बीजाणू निर्मिती, इत्यादी प्रकारे विविध सजीवांमध्ये अलैंगिक प्रजनन केले जाते. | 5. लैंगिक प्रजननामध्ये युग्मक निर्मिती व फलन या प्रमुख प्रक्रिया घडतात. |
