School Study

इयत्ता १० वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 पाठ ३: सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग - 2

प्र.१

1. खालील तक्ता पूर्ण करा.

उत्तर

अलैंगिक प्रजननलैंगिक प्रजनन
1. कायिक पेशींच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास अलैंगिक प्रजनन म्हणतात.1. लैंगिक प्रजनन हे स्त्रीयुग्मक आणि पुंयुग्मक या जननपेशींच्या मदतीने होते.
2. या प्रजननासाठी एकाच जनकाची आवश्यकता असते.2. लैंगिक प्रजननासाठी नर जनक आणि मादी जनक अशा दोन जनकांची आवश्यकता असते.
3. हे प्रजनन फक्त सूत्री विभाजनाच्या मदतीने होते.3. युग्मकांची निर्मिती अर्धसूत्री विभाजनाने होते आणि त्यानंतर फलन घडून येते.
4. या प्रजननाने तयार झालेला नवीन जीव जनुकीय दृष्ट्या जनकाशी तंतोतंत समान असतो.4. या प्रजननाने तयार होणारा नवीन जीव जनुकीय दृष्ट्या जनकांपेक्षा वेगळा असतो.
5. द्विविभाजन, बहुविभाजन, कलिकायन, खंडीभवन, पुनर्जनन, शाकीय प्रजनन, बीजाणू निर्मिती, इत्यादी प्रकारे विविध सजीवांमध्ये अलैंगिक प्रजनन केले जाते.5. लैंगिक प्रजननामध्ये युग्मक निर्मिती व फलन या प्रमुख प्रक्रिया घडतात.

या पाठातील आणखी प्रश्न