1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानांचे स्पष्टीकरण लिहा.
उत्तर
अ. एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर ATP चे एकूण .......... रेणू मिळतात.
उत्तर: 38 रेणू. ग्लुकोजच्या पूर्ण ऑक्सिडीकरणात ग्लायकोलायसीस, पायरुविक आम्लाचे अॅसेटील-को-एन्झाईम-A मध्ये रूपांतर, क्रेब्ज चक्र आणि इलेक्ट्रॉन वहन साखळी या प्रक्रियांमधून एकूण 38 ATP रेणू मिळतात.
