सरावसंच 1 — 1. खाली दिलेल्या मापांचे रेषाखंड काढा व त्यांचे लंबदुभाजक काढा.
उत्तर
(1) 5.3 सेमी
पट्टीच्या साहाय्याने 5.3 सेमी लांबीचा रेख AB काढा.
कंपासमध्ये रेख AB च्या निम्म्या लांबीपेक्षा जास्त अंतर घ्या.
कंपासचे लोखंडी टोक A वर ठेवून रेख AB च्या वरच्या बाजूला एक व खालच्या बाजूला एक कंस काढा.
कंपासमधील अंतर तेच ठेवून लोखंडी टोक B वर ठेवा व आधीच्या दोन्ही कंसांना छेदणारे कंस काढा. छेदनबिंदूंना P (वरचा) व Q (खालचा) अशी नावे द्या.
पट्टीने रेषा PQ काढा. ती रेख AB ला ज्या बिंदूत छेदते, त्या बिंदूला M नाव द्या.
पडताळा: मोजल्यास l(AM) = l(MB) = 2.65 सेमी आणि m∠PMB = 90° येतात.
उत्तर: रेषा PQ ही 5.3 सेमी लांबीच्या रेख AB ची लंबदुभाजक आहे.
