School Study

इयत्ता ९ वी भूगोल पाठ ३: बाह्यप्रक्रिया भाग-१

प्र.१

स्वाध्याय प्रश्न १. थोडक्यात उत्तरे लिहा.

उत्तर

(अ) कायिक विदारण म्हणजे काय?
उत्तर: खडकांच्या रासायनिक घटकांमध्ये कोणताही बदल न होता केवळ भौतिक कारणांमुळे खडक फुटणे, त्यांना तडे जाणे किंवा त्यांचे लहान तुकडे होणे, याला कायिक विदारण असे म्हणतात. कायिक विदारण मुख्यतः तापमान, दहिवर, स्फटिकांची वाढ, दाबमुक्ती व पाणी या कारणांमुळे घडून येते. उदा., सततच्या प्रसरण-आकुंचनामुळे खडकाचे वरचे थर कांद्याच्या पापुद्र्याप्रमाणे सुटे होतात, याला अपपर्णन म्हणतात; तसेच तडांमध्ये साचलेले पाणी गोठल्यावर खडक फुटतात. खंड-विखंडन, कणात्मक विदारण व छिन्न-भिन्न विदारण हीदेखील कायिक विदारणाची उदाहरणे आहेत. ज्या प्रदेशात दैनंदिन तापमानकक्षा खूप जास्त असते, अशा कोरड्या हवामानाच्या प्रदेशात (उदा., उष्ण वाळवंटी प्रदेश) कायिक विदारणाचा प्रभाव जास्त असतो.

या प्रश्नाचे आणखी ३ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा

या पाठातील आणखी प्रश्न