School Study

इयत्ता ९ वी भूगोल पाठ १०: नागरीकरण

प्र.१

स्वाध्याय प्रश्न १. पुढील समस्येवर उपाय सुचवा.

उत्तर

(अ) शहरातील झोपडपट्ट्यांची संख्या वाढत आहे.
उत्तर: ज्या प्रमाणात शहरातील लोकसंख्या वाढते, त्या प्रमाणात निवासव्यवस्था वाढत नाही आणि बहुतांशी स्थलांतरित आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याने त्यांना शहरातील घरे परवडत नाहीत. त्यामुळे झोपडपट्ट्या वाढतात. यावर पुढील उपाय करता येतील.

  1. शासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कमी किमतीची (परवडणारी) घरे मोठ्या प्रमाणावर बांधावीत.
  2. अस्तित्वात असलेल्या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करावे आणि तेथे पिण्याचे पाणी, शौचालये, सांडपाणी व्यवस्था, वीज, रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधा द्याव्यात.
  3. नगरनियोजनाचे नियम कडक करून मोकळ्या जागेवरील अनधिकृत बांधकामे रोखावीत.
  4. ग्रामीण भागात व लहान शहरांत रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात, म्हणजे मोठ्या शहरांकडे होणारे स्थलांतर कमी होईल.
  5. शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून आधीच योग्य नगरनियोजन करावे.
या प्रश्नाचे आणखी ४ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा

या पाठातील आणखी प्रश्न